Home नाशिक विक्रम गोखले म्हणाले, कंगना योग्यच बोलली, आता शरद पवार म्हणतात…

विक्रम गोखले म्हणाले, कंगना योग्यच बोलली, आता शरद पवार म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : अभिनेत्री कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरून अभिनेते विक्रम गोखले यांनी प्रतिक्रिया देत कंगणाच्या वकतव्याचं समर्थन केलं.

हे ही वाचा : “ग्रामीण भागातही मनसे सुसाट; ‘नवनिर्माण जनसंपर्क यात्रे’ला जोरदार प्रतिसाद”

‘कंगना म्हणाली ते खरं आहे. मी तिच्या वक्तव्याचं समर्थन करतो, कुणाच्या मदतीने नाही तर देशाला स्वातंत्र्य हे भिकेनेच मिळालं आहे, स्वातंत्र्यविर फाशीवर जात असताना त्यांना कुणीही रोखलं नाही’ , असं म्हणत विक्रम गोखले यांनी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी अस मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात, असं म्हणत शरद पवारांनी विक्रम गोखलेंच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं. ते आज निफाडला आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं- रावसाहेब दानवे

बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा टोला

राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश