Home महाराष्ट्र “मनसेचा मोठा निर्णय; रायगड, राजगड, पन्हाळागडासह 11 किल्ल्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचं...

“मनसेचा मोठा निर्णय; रायगड, राजगड, पन्हाळागडासह 11 किल्ल्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन करणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास घराघरांत पोहचवणारे शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं काल निधन झालं. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनानंतर मनसेनं मोठा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही काँग्रेसला दणका; काँग्रेस नगराध्यक्षाचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश”

बाबासाहेबांच्या अस्थीचं विसर्जन 11 किल्ल्यांवर करण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर बाबासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिवशाहिरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी तसेच पुरंदर प्रेमींनी एकच गर्दी केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

विक्रम गोखले म्हणाले, कंगना योग्यच बोलली, आता शरद पवार म्हणतात…

“ग्रामीण भागातही मनसे सुसाट; ‘नवनिर्माण जनसंपर्क यात्रे’ला जोरदार प्रतिसाद”

पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरविते, त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं- रावसाहेब दानवे