Home देश “सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कंगना रणौतची महात्मा गांधी-पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका”

“सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कंगना रणौतची महात्मा गांधी-पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका”

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी श्रद्धांजली अर्पण करताना कंगनाने महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची त्यांच्या जयंतीनिमित्त आठवन काढते. तुम्ही अशा व्यक्ति होतात ज्यांनी आम्हाला आजचा भारत दिला. पन तुम्ही पंतप्रधान पदाचा त्याग करून महान नेतृत्व आणि दूर दर्शितेला आमच्या पासून दूर केल. तुमच्या या निर्णयाची आम्हाला खंत आहे, असं कंगना  म्हणाली.

गांधींना खुश करण्यासाठी भारताच्या पहील्या पंतप्रधान पदाच्या रुपात तुम्ही योग्य आणि निर्वाचित पदाचे बलिदान दिले. गांधींना वाटायचं की नेहरु खूप चांगल इंग्रजी बोलतात. यामुळे सरदार पटेल यांनाच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले. आपला हक्क असलेली गोष्ट आपण निर्लज्जपणे खेचून घ्यायला हवी, तो आपला हक्क आहे, असं कंगणानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.


महत्वाच्या घडामोडी-

वृद्धिमान साहा-जेसन होल्डरची शानदार फलंदाजी; हैदराबादची बेंगलोरवर 5 विकेट्सनी मात

“जेम्स बाँडची भूमिका साकारलेले हाॅलिवूड अभिनेते सीन काॅनेरी काळाच्या पडद्याआड”

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

ईशान किशनची नाबाद मॅचविनिंग खेळी; मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी मात