Home नागपूर नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार?

नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर:  नागपुरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेचे नागपूर सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मंगेश काशीकर यांनी शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांची भेट घेतली. यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा : गद्दार अधिवेशनाला आले, पण ते…; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

किरण पांडव यांच्यामार्फत काशिकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे.

दरम्यान, एकीकडे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये सुरू असलेली गळती थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ‘या’ गावातील असंख्य महिला, युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

50 खोके एकदम ओके, सरकारचा धिक्कार असो; विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी