Home महाराष्ट्र गद्दार अधिवेशनाला आले, पण ते…; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

गद्दार अधिवेशनाला आले, पण ते…; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

अलिबाग : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. अशातच आज आदित्य ठाकरे यांनी अलिबाग येथे सभा होती. यावेळी बोलताना, बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला.

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. आज गद्दार अधिवेशनाला आले होते. पण ते नजरेला नजर भिडवू शकले नाहीत. त्यांची हिंमतही झाली नाही. कारण ते 40 जण गद्दार आणि निर्लज्ज आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ‘या’ गावातील असंख्य महिला, युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

दरम्यान, पहिल्या बॅचमध्ये गेलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. महाविकास आघाडीत जे मंत्री होते त्यांनाच स्थान मिळालं आहे. आमचा गेम झाला असं त्यांना आता वाटत असेल. आपण ह्या गेलेल्या लोकांना गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि प्रतिष्ठा दिली, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ‘या’ गावातील असंख्य महिला, युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

50 खोके एकदम ओके, सरकारचा धिक्कार असो; विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी