Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा काँग्रस, राष्ट्रवादीला मोठा धक्का; तब्बल 41 जणांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

मुख्यमंत्र्यांचा काँग्रस, राष्ट्रवादीला मोठा धक्का; तब्बल 41 जणांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

265

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विविध पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसचं सरपंच व सदस्य अशा 41 जणांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “रूग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन”

दरम्यान, या सर्वांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वाई तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सदस्य दिनकर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राधाबाई शिंदे, युवा नेते विकास शिंदे, वाई पालिकेच्या माजी नगरसेविका शोभाताई शिंदे, नवीन मुंबई राष्ट्रवादी महिला आघाडी उपाध्यक्ष राजश्रीताई येवले, माजी पंचायत समिती सदस्य राजेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मीच जनतेच्या मनातील आमदार म्हणणाऱ्या, बंडखोर उमेद्वार राहुल कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द”

“चिंचवडमध्ये पराभव, मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा डंका, 7 जागांवर मारली बाजी”

“छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा डंका, भाजपच्या अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केला ठाकरे गटात प्रवेश”