Home महाराष्ट्र “चिंचवडमध्ये पराभव, मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा डंका, 7 जागांवर मारली बाजी”

“चिंचवडमध्ये पराभव, मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा डंका, 7 जागांवर मारली बाजी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजप-एनडीपीपी युतीला बहुमत मिळालं आहे. एकूण 60 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 37 जागांवर भाजप-एनडीपीपी युतीचा विजय झाला आहे.

या 37 पैकी एनडीपीपीला 25 जागा, तर भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत. तर चिंचवड पोटनिवडणूकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही या निवडणूकीत आपली छाप सोडली आहे. राष्ट्रवादीनं एकूण 7 जागांवर बाजी मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : “छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा डंका, भाजपच्या अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केला ठाकरे गटात प्रवेश”

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत, एनडीपीपी 32.33 टक्के मतांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भाजपला 18 टक्के मतं मिळाली आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने हिसकावला; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय

कसब्यात भाजपला धक्का; रविंद्र धंगेकर विजयी होणार?

40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी…; रामदास आठवलेंची, शायरीतून टोलेबाजी