Home पुणे भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने हिसकावला; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय

भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने हिसकावला; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय

216

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 28 वर्षानंतर परिवर्तन झाले आहे. गेल्या 28 वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला कसबा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे.

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची केवळ औपचारिकता राहिली आहे. धंगेकर सात हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचे दिसून येत असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.

हे ही वाचा : कसब्यात भाजपला धक्का; रविंद्र धंगेकर विजयी होणार?

कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुक जाहीर झाली. भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आली.

दरम्यान, या निवडणुकीत सन 1991 च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आलं आहे. 1991 मध्ये विद्यमान खासदार गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत कँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर मात्र बापट यांनी मतदारसंघाची बांधणी करत कसबा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व ठेवले होते. ते या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले होते. ते खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली.

महत्त्वाच्या घडामोडी –

40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी…; रामदास आठवलेंची, शायरीतून टोलेबाजी

“ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही”

“अंकल, अंकल, काकीला सांगील, मग…; अजित पवारांनी सभागृहात बोलताच, एकच हशा पिकला”