Home महाराष्ट्र “अंकल, अंकल, काकीला सांगील, मग…; अजित पवारांनी सभागृहात बोलताच, एकच हशा पिकला”

“अंकल, अंकल, काकीला सांगील, मग…; अजित पवारांनी सभागृहात बोलताच, एकच हशा पिकला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी अनेक महत्वाच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली. तसेच यावेळी विरोधकांनी, सरकारवर जोरदार निशाणा साधला.

यामध्ये कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र, याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते गिरीज महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार सभागृहात बोलत असताना, ते कांद्याचा प्रश्न, सरकारने जाहिरातबाजींवर केलेला खर्च, अशा अनेक मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र अजित पवार बोलत असताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांना रोखण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : “मनसेत गटबाजी की चूक?; नाशिकमधील ‘त्या’ बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण”

दरम्यान, याच वेळी अजित पवार यांच्या पाठिमागे बसलेल्या धनंजय मुंडे यांनी महाजन यांना अंकल अंकल म्हणत डिवचलं. हे ऐकून अजित पवारही आपल्या भाषणात म्हणाले, ”अंकल अंकल काकीला सांगीन.. मग किती काकी आहेत ते बघावं लागेल..” असं म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपने आधी स्वतःचे घर सांभाळावं आणि मगच…; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागला नाही तर रक्तपात होईल; ठाकरे गटाचं खळबळजनक वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…