Home महाराष्ट्र “मनसेत गटबाजी की चूक?; नाशिकमधील ‘त्या’ बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण”

“मनसेत गटबाजी की चूक?; नाशिकमधील ‘त्या’ बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. याच दरम्यान अमित ठाकरे यांचं स्वागत केलं जात असतांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरवरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो बॅनरवर नसल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच जाणीवपूर्वक हा फोटो टाळला गेला की, नजरचुकीने राहून गेला, याबाबत मनसेच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्तींच्या यादीत डॉ. प्रदीप पवार यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी 2014 च्या निवडणुकीत डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो या बॅनरवर नसल्याने मनसेच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, मनसेत गटबाजी आहे का ? जाणून बुजून फोटो लावला गेला नाही ? याशिवाय नजरचुकीने हा फोटो राहिला असावा असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.