Home महाराष्ट्र 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी…; रामदास आठवलेंची, शायरीतून टोलेबाजी

40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी…; रामदास आठवलेंची, शायरीतून टोलेबाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी अनेक महत्वाच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली.

आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही”

कोण चोर आहे, कोण तुरुंगामध्ये जाऊन आले ते सगळ्यांना माहीत आहे. ‘’हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर’, अशी कविता करत आठवलेंनी राऊतांना टोला लगावला आहे.  ते नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, 40 आमदार हिम्मतवाले आहेत. खरी शिवसेना त्यांचीच आहे, न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागेल, असा दावाही रामदास आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अंकल, अंकल, काकीला सांगील, मग…; अजित पवारांनी सभागृहात बोलताच, एकच हशा पिकला”

भाजपने आधी स्वतःचे घर सांभाळावं आणि मगच…; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागला नाही तर रक्तपात होईल; ठाकरे गटाचं खळबळजनक वक्तव्य