Home महाराष्ट्र “रूग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन”

“रूग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं डोंबिवलीत निधन झालं. धक्कादायक बाब म्हणजे देसाई यांना एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना रूग्णवाहिका मध्येच बंद पडली. त्यामुळे देसाई यांना वेळेत उपचार मिळाला नसल्याचा आरोप देसाई यांच्या कूटूंबियांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, देसाई यांची प्रकृती खालावल्यानंतर तातडीनं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नेत असताना रूग्णवाहिका मध्येच बंद पडली.

हे ही वाचा : “मीच जनतेच्या मनातील आमदार म्हणणाऱ्या, बंडखोर उमेद्वार राहुल कलाटे यांचं डिपाॅझिट रद्द”

म्हणजे त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत असताना रुग्णवाहिकाच बंद पडली. त्यामुळे देसाई यांना वेळेत उपचार मिळाले नसल्याचा आरोप माजी आमदार देसाई यांच्या कुटुंबियांनी केलाय. सूर्यकांत देसाई हे परळ लालबाग मतदारसंघाचे आमदार होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देसाई यांची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होते. तेंव्हा ज्या रुग्णवाहिकेतून देसाई यांना नेण्यात येत होतं ती मधेच बंद पडली. यावेळी रुग्णवाहिकेला काही अंतर धक्काही द्यावा लागला. शेवटी रुग्णवाहिका सुरू न झाल्यानं दुसरी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. तिथे डॉक्टरांनी देसाई यांचा इसीजी काढला. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. आता या प्रकरणी कुटुंबियांकडून रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“चिंचवडमध्ये पराभव, मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा डंका, 7 जागांवर मारली बाजी”

“छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा डंका, भाजपच्या अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केला ठाकरे गटात प्रवेश”

भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने हिसकावला; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय