आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोला : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील प्रवेशाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता अकोल्यातील राष्ट्रवादीच्या या माजी आमदारानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी काल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. सिरस्कार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : शिवरायांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर…; बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
दरम्यान, आठच दिवसांपूर्वी सिरस्कार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेजच काल त्यांनी बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत केला शिंदे गटात प्रवेश”
पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान, म्हणाल्या…
राष्ट्रवादीचा ‘तो’ पाचवा नेता अजित पवार नाही; भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं