Home महाराष्ट्र अनिल देशमुखांची सुटका होताच, शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आता पंतप्रधान...

अनिल देशमुखांची सुटका होताच, शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, आता पंतप्रधान मोदींना आणि अमित शहांना…

471

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची काल 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. यावेळी देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आणि कार्येकर्त्यांनी जेलबाहेर गर्दी केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देशमुखांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

जेलबाहेर येताच अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत, ‘मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं असल्याचं सांगत माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर आरोप केले. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : जेलबाहेर येताच, अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, परमवीर सिंग आणि सचिन वाझेनं…

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल 14 महिन्यांनी जामीन मिळाला. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका झाली. आपल्या सहकाऱ्यांना खूप यातना सोसाव्या लागल्या. अशा प्रकारच्या यातना आणखी कुणावर सोसण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

सत्तेचा वापर कसा होतो त्याचं हे उदाहरण आहे. अनिल देशमुख यांच्यासारखा इतर कुणावर अत्याचार होऊ नये यासाठी गरज पडल्यास मोदींची भेट घेऊ. मी आणि संसदेचे काही सीनियर सहकारी गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार आहोत. आमच्या काही सहकाऱ्यांना यातना सोसाव्या लागल्या. इतरांवर ही स्थिती येऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश”

मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की,…; फडणवीसांसमोर अजित पवारांच्या विधानाने सभागृहात सर्वांना हसू अनावर

“उद्धव ठाकरे आणि मी, आज नागपूरात मोठा बाॅम्ब फोडणार?; संजय राऊतांच्या गाैफ्यस्फोटाने खळबळ”