Home महाराष्ट्र जेलबाहेर येताच, अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, परमवीर सिंग आणि सचिन वाझेनं…

जेलबाहेर येताच, अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, परमवीर सिंग आणि सचिन वाझेनं…

317

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची आज 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काही तासांपूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. यावेळी देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आणि कार्येकर्त्यांनी जेलबाहेर गर्दी केली होती.

जेलबाहेर येताच अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर आरोप केले.

‘मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं आहे. परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंग यांनी मी केलेले आरोप ऐकिव माहितीवर आहेत, माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही, असं अॅफिडेविट दिलं., असं देशमुख म्हणाले.

हे ही वाचा : “शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश”

परमवीर सिंग यांच्या अत्यंत जवळचा सचिन वाझे याने माझ्यावर आरोप केले, पण सचिन वाझे यांच्यावरच गंभीर आरोप आहेत. या सचिन वाझे याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे,’ असंही देशमुख म्हणाले.

दरम्यान, माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं निरीक्षण सुद्धा न्यायालयाने केलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला, याबाबत मी सगळ्यांचे आभार मानतो. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया देशमुखांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की,…; फडणवीसांसमोर अजित पवारांच्या विधानाने सभागृहात सर्वांना हसू अनावर

“उद्धव ठाकरे आणि मी, आज नागपूरात मोठा बाॅम्ब फोडणार?; संजय राऊतांच्या गाैफ्यस्फोटाने खळबळ”

शरद पवार खरंच नाराज आहेत का?; उत्तर देताना अजित पवार पत्रकारांवरच भडकले, म्हणाले…