Home पुणे विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे...

विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे बाबा…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची भाषा केली होती.

मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. मला पक्ष संघटनेतील कोणतंही पद द्या, अशी विनंती अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना केली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : “एकनाथ खडसेंची घेतलेली भेट यशस्वी ठरली?; पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार?; ‘या’ मोठ्या नेत्याच्या विधानाने खळबळ”

मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्त्वाचं विरोधी पक्षनेतेपद आहे. मात्र असं असताना अजित पवारांना हे पद का नको आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आता खुद अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मागील 32 वर्षात मी आमदार-खासदारकीसह अनेक पदं भूषवली. आता पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर त्यात वाईट काय आहे? असं प्रतिसवाल अजित पवारांनी यावेळी केला. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तुमच्याकडे एवढ्या मोठ्या ताकदीचं पद आहे, तर तुम्हांला का नको आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर, अजित पवारांनी, “अरे बाबा, मी मागील 32 वर्षात राज्यमंत्रीपद, आमदारकी, खासदारकी, कॅबिनेट मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद अशी सगळी पदं भुषवली आहेत. एवढी सगळी पदं भूषवल्यानंतर मी संघटनेचंही काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली, यात वाईट काय आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता पक्षातून बाहेर पडणार”

“विदर्भात मनसेला धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेणार”

विरोधी पक्ष कधी…; पाटण्यातल्या बैठकीनंतर मनसेने राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ केला शेअर