Home नाशिक अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू

अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला आहे. ‘छगन भुजबळ यांच्या विरोधातली याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या टोळीतील एका गुंडाने मला धमकीचा फोन केला’ असा आरोप सुहास कांदे यांनी केला. यानंतर छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुहास कांदे यांनी या धमकीबाबचतच्या तक्रारीचे पत्र नाशिकच्या पोलिस आयुक्तांना दिल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भुजबळ यांनी याबद्दल संपूर्ण माहिती घेवून या प्रकरणाची तातडीने चौकशी करा, असं आदेश नाशिक पोलिसांना दिले आहेत.

‘आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मंत्रीमंडळाची बैठक सुरु असताना मला याबद्दल माहिती मिळाली. यानंतर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबद्दल माहिती दिली. या प्रकारणात ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे धमकी मिळणे राज्य सरकार सहन करणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राजीनाम्यानंतर अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी सोडलं माैन, म्हणाले…

…तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली म्हणून समजा- सुप्रिया सुळे

पुण्यातील मनसेच्या नेत्यांचा भाजपसोबत युतीचा आग्रह; राज ठाकरे म्हणाले…

मुंबई इंडियन्सचा जोरदार कमबॅक; पंजाबवर 6 विकेट्सनी विजय