…तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली म्हणून समजा- सुप्रिया सुळे

0
397

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीची ससेमिरा लागली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये जर कोणी इच्छुक असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला ईडीची नोटीस आली असेल आणि पाऊस पडला असेल तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली समजा, असा सल्ला सुप्रिया सुळेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यातील बावधनमध्ये रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यात त्या बोलत होत्या.

दरम्यान, निवडणुकांमध्ये आपला ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. तसेच कोणास तिकीट मिळणार आहे, मला माहित नाही. जे इच्छुक पावसात भिजले आहेत त्यांनी समजावं की, पप्पू पास हो गया है, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यातील मनसेच्या नेत्यांचा भाजपसोबत युतीचा आग्रह; राज ठाकरे म्हणाले…

मुंबई इंडियन्सचा जोरदार कमबॅक; पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घोटाळा करण्याची कला विकसित केली; किरीट सोमय्यांचा आरोप

जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत; पंकजा मुंडेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here