Home क्रीडा मुंबई इंडियन्सचा जोरदार कमबॅक; पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

मुंबई इंडियन्सचा जोरदार कमबॅक; पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

IPL 2021: इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आज दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 135 धावा करत मुंबई समोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19 षटकात  विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला.

रोहित शर्मा आणि क्विंटॉन डी कॉक सलामी फलंदाजीसाठी उतरले. मात्र, त्यांची जोडी फार काळ मैदानावर टिकली नाही. चौथ्या षटकात रवी बिश्नोईने रोहितला तिसऱ्या चेंडूवर 8 धावांवर, तर सूर्यकुमारला चौथ्या चेंडूवर शून्य धावेवर माघारी धाडले. यानंतर डी कॉकने सौरभ तिवारीसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण डी कॉकला मोहम्मद शमीने 10 व्या षटकात त्रिफळाचीत केले. तो 27 धावा करुन बाद झाला.

नंतर तिवारीने हार्दिक पंड्याला साथीला घेत मुंबईचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. पण तिवारीला मोक्याच्या क्षणी 16 व्या षटकात नॅथन एलिसने 45 धावांवर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्याचा झेल यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने कायरन पोलार्डला साथीला घेत मुंबईला विजयाच्या दिशेने नेले. हार्दिकने 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 40 धावांची खेळी केली. तर, पोलार्डने 7 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 15 धावा केल्या.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घोटाळा करण्याची कला विकसित केली; किरीट सोमय्यांचा आरोप

जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत; पंकजा मुंडेंची टीका

शिवसेना नेत्यांवरील ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही- सुधीर मुनगंटीवार

पोटनिवडणुकीने निघाला भाजपा-मनसे युतीचा मुहूर्तच; आणखी ‘या’ 4 ठिकाणी युती होणार!