Home महत्वाच्या बातम्या उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश

उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश

775

मुंबई : भाजपला ठाकरे सरकारकडून मोठा धक्का मिळणार आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार असलेले अद्वय हिरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी विचार सभा घेऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मालेगाव शहरासह ग्रामीण भागात हिरे यांचा मोठा दबदबा आहे. नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हिरे कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. याच कुटुंबातील अद्वय हिरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार असून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना क्षह देण्यासाठी हा प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांचा प्रवेश करून भाजपाला मोठा धक्का देत भविष्यात शिंदे गटाचे मंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे हे राजकीय आखाड्यात उभे राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचं मोठं योगदान आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवार आजही भाजपबरोबर; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

 मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर होत असताना…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

“नाशिकमध्ये ठाकरेंचा यशस्वी डाव; भाजपचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”