Home महाराष्ट्र मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर होत असताना…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर होत असताना…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एबीपी माझाशी बोलत असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर करताना माझी अडचण झाली होती. महाराष्ट्रातलं चांगलं सुरू असलेलं सरकार फोडून भाजपला त्यांचं सरकार आणायचं होतं. ते सरकार आणताना यादी केली गेली, तेंव्हा अडसर कोण ठरू शकतं त्याची यादी केली गेली, त्यात पहिलं नाव माझं होतं. देशाच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरून मला अटक केली गेली, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी यावेळी केला. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात राऊत बोलत होते.

हे ही वाचा : “नाशिकमध्ये ठाकरेंचा यशस्वी डाव; भाजपचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर घडणार होतं, मला खोट्या प्रकरणात अटक केली. का अटक केली? शिंदे-फडणवीस सरकार बनत असताना अडथळे कुणाचे होऊ शकतात याची यादी काढली गेली. चार लोकं दिल्लीत गेले ते आज सरकारमध्ये आहेत. तिथे सांगण्यात आलं की, संजय राऊतांचा बंदोबस्त करा. त्यानंतर फोन उचलला गेला आणि हे सांगण्यात आलं की, संजय राऊत को अंदर डालो. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे छापा पडला आणि मला अटक झाली. आमचेही दिवस येतील पण आम्ही असं कधीही वागणार नाही. लक्षात घ्या, गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मला अटक होऊच शकत नाही. जो देशातल्या संसदेचा 20 वर्षे खासदार आहे त्याला अटक करायची असेल तर आदेश लागतोच ना? ईडीला राजकीय आदेश आला, त्यामुळे अटक झाली. कारण हे सरकार स्थापन करायचं होतं. त्यांना अडथळे नको होते, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर बाळासाहेबांनी, संजय राऊतांना पायाखाली तुडवलं असतं; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचं विधान”

“अखेर ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीला ग्रीन सिग्नल, ‘या’ दिवशी होणार युती”

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….