Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात तिथे पंकजा मुंडे नसतात त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

“माझ्या मनात कोणतीही खदखद नाही.” असं पंकजा मुंडे म्हणल्या आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

हे ही वाचा : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला खिंडार ; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जेपी नड्डा आले मी आले. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाकरे गटाची ऑफर स्विकारणार का?; पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाल्या…

“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

नाॅट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील आज विभागीय कार्यालयात दाखल, म्हणाल्या…