Home महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, संप मागे घ्या; शरद...

सरकारवर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, संप मागे घ्या; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली.

या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा : तमिल थलाइवाजाचा विजयी धमाका; हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात

एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केलं. तसेच तुमच्या इतर प्रश्नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेन, अशी ग्वाही शरद पवारांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिली.

दरम्यान, सरकारवर विश्वास ठेवा, संप मागे घ्या. तसेच कामावर रूजू व्हा, असं आवाहन शरद पवारांनी कर्मचाऱ्यांना केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना

एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल ते बरळतायत; गिरीश महाजनांचा पलटवार