Home महाराष्ट्र मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना

मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील  यांना कोरोनाची लागण झाली आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मुंबई पोलीस दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे.

सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह संदीप कार्णिक, सत्यनारायण चौधरी, अतुल पाटील, दिलीप सावंत या चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांना कोरोना झाला आहे.

हे ही वाचा : एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल ते बरळतायत; गिरीश महाजनांचा पलटवार

दरम्यान, पुण्यातही गेल्या 8 दिवसात 232 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

आमची चूक झाली, आम्ही आता वकील बदलत आहोत; पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी आक्रमक

‘…अन् राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता’; एकनाथ खडसेंचा भाजपाला सवाल

तुफान बर्फवृष्टी अन् हाडं गोठवणार्या थंडीत भारतीय जवानांच नृत्य; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल