Home देश तुफान बर्फवृष्टी अन् हाडं गोठवणार्या थंडीत भारतीय जवानांच नृत्य; व्हिडीओ होतोय प्रचंड...

तुफान बर्फवृष्टी अन् हाडं गोठवणार्या थंडीत भारतीय जवानांच नृत्य; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : भारतीय जवानांचा एक जबरदस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जम्मु-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि जम्मू-काश्मीरच्या अग्रीम चौकीवर सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कडाक्याच्या थंडीतही भारतीय सैन्याचे जवान हाती राष्ट्रध्वज घेऊन एक पारंपारिक नृत्य करत आहेत.

भारतीय सैन्याचे जवान ‘खुकुरी’ हा पारंपारिक नृत्य प्रकार सादर करत आहेत आणि एका जवानानं राष्ट्रध्वज हाती घेतला आहे. भारतीय जवानांचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत.

हे ही वाचा : शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…

दरम्यान, भारतीय सैन्याचे जवान तुफान बर्फवृष्टी होत असताना हाती राष्ट्रध्वज घेऊन एक पारंपारिक नृत्य करत असल्याचा व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

मॅडम सोबत विद्यार्थ्याने केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

‘…पण गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंचा पलटवार

‘या’ सरकारमध्ये आम्हाला कुणी विचारत नाही, मी भाजपाच्या पाठिंब्याने आमदार झालो; शिवसेना आमदारांचं मोठं वक्तव्य