Home नांदेड शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…

शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…

571

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी हजारो एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या लेटरहेडवरील एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून एसटी कर्मचारी आणि कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. असं म्हणत एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं अशी, मागणी या पत्रात करण्यात आली आहे आणि हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

हे ही वाचा : मॅडम सोबत विद्यार्थ्याने केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कामगार हे तुटपुंजा वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आता वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटाला कंटाळून एसटी महामंडळाच्या 63 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.तरी एसची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करुन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, असं या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी मात्र या पत्राबाबत वेगळंच स्पष्टीकरण दिलंय. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र हे पत्र जनभावना असल्याचं म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी – 

‘…पण गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंचा पलटवार

‘या’ सरकारमध्ये आम्हाला कुणी विचारत नाही, मी भाजपाच्या पाठिंब्याने आमदार झालो; शिवसेना आमदारांचं मोठं वक्तव्य

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ठाण्यात अविनाश जाधव यांच्या हस्ते अनेक महिला आणि युवकांचा मनसेत प्रवेश