Home महाराष्ट्र सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने; ‘या’ कारणासाठी उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं

सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने; ‘या’ कारणासाठी उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : कोकणातलं शिवसेना विरुद्ध राणे हे राजकीय सर्वांनाच माहिती आहे. असातच आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याचे चित्र काही काळ दिसून आलं.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मंत्री उदय सामंत यांनाच घेराव घातला. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोना

जिल्हा समितीच्या ऑनलाईन बैठकीला भाजप कार्यकर्ते जोरदार विरोध करताना दिसून आले. जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन का घेता? असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना नियोजन सभागृहाच्या बाहेर घेराव घातला. यात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजन म्हापसेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, केंद्र सरकारच्या गाईड लाईन्सप्रमाणे ऑनलाईन बैठक घेत असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

दरम्यान, भाजपच्या पाच सदस्याना ऑफलाईन मिटींगला का घेतलं नाही? असा सवालही भाजप कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आला. याशिवाय 2022 आणि 23 चा आराखडा चर्चेशिवाय मंजूर कसा करणार? असे अनेक प्रश्न विचारत भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या घडामोडी – 

एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल ते बरळतायत; गिरीश महाजनांचा पलटवार

आमची चूक झाली, आम्ही आता वकील बदलत आहोत; पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी आक्रमक

‘…अन् राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता’; एकनाथ खडसेंचा भाजपाला सवाल