Home जळगाव ‘…अन् राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता’; एकनाथ खडसेंचा भाजपाला सवाल

‘…अन् राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता’; एकनाथ खडसेंचा भाजपाला सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : मी चाळीस वर्ष तुमच्याबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आणी एका वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो की मागं ईडी लावता, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एखदा भाजपवर निशाणा साधला आहे. ते  जळगावातील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

एका वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो की मागं ईडी लावता. मी चाळीस वर्ष तुमच्याबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे  गेलो की तुम्ही ईडी लावता आणि तुम्ही तारीख पे तारीख सुरु, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपवर व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता एकनाथ खडसे यांनी जहरी टीका केली आहे.

हे ही वाचा : तुफान बर्फवृष्टी अन् हाडं गोठवणार्या थंडीत भारतीय जवानांच नृत्य; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

भाजपमध्ये काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केलं, परिश्रम केलं, कष्ट केलं हे तुम्ही पाहिलं आहे. अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, 40 वर्ष रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. 30 वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…

मॅडम सोबत विद्यार्थ्याने केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

‘…पण गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंचा पलटवार