Home महाराष्ट्र वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या…; रूपाली पाटलांकडून...

वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या…; रूपाली पाटलांकडून मनसे उमेद्वारांचं अभिनंदन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून मनसेनं ग्रामीण भागात आपलं वर्टस्व स्थापित केलं.

मनसेनं सोलापूर जिल्ह्यात आपल्या विजयाचं खातं उघडलं आहे. माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांची पत्नी रेश्मा सुरेश टेळे या नगरसेवक पदी विजयी झाल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया देत मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचं अभिनंदन केलं.

हे ही वाचा :  “भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

Dilip Dhotre बापू अभिनंदन माळशिरस नगरसेवक पदी मनसेतील भगिनी सौ. रेश्मा सुरेश टेळे विजयी झाल्या त्यांचे अभिनंदन. वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या “बापूला” आज शुभेच्छा !!! खडकावर बाग फुलवण्याची महत्वाकांक्षा ठेवणारा दिलदार भाऊ ; त्याच्या संघर्षाला व संघर्षाच्या शिलेदारास शुभेच्छा., अशी पोस्ट करत रूपाली पाटलांनी दिलीप धोत्रेंसह मनसेच्या विजयी उमेद्वार रेश्मा टोळे यांचं अभिनंदन केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

हत्तीच्या पिल्लाला चंपा, तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; किशोरी पेडणेकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

गोपीचंद पडळकरांचा मोठा पराभव; खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा