Home महाराष्ट्र गोपीचंद पडळकरांचा मोठा पराभव; खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा

गोपीचंद पडळकरांचा मोठा पराभव; खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची  सरशी पाहायला मिळत आहे.  सांगलीच्या कवठे महाकाळ नगर पंचायतीवर दिवंगत आर. आर. पाटील याचा मुलगा रोहित पाटीलने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर गोपीचंद पडळकर यांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही.

खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही.

हे ही वाचा : “आजचा शिवसेनेचा विजय हा विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा”

काँग्रेस-शिवसेना आघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबर यांच्या खांद्यावर देण्यात आलं होतं. तर भाजपची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 27 नगर पंचायतींवर रष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलं आहे. 22 नगर पंचायतींसह भाजप दुसऱ्या, 21 नगर पंचायतींसह काँग्रेस तिसऱ्या तर 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. अशावेळी काही धक्कादायक तर काही आश्चर्यकारक निकालही पाहायला मिळाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

यवतमाळमध्ये मनसेनं विजयी खातं उघडलं, मारेगाव नगरपंचायतीत मनसेचे 2 उमेद्वार विजयी

औरंगाबादेत रावसाहेब दानवेंना धक्का! सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना धक्का; बीड नगरपंचायतीवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व