Home महाराष्ट्र “आजचा शिवसेनेचा विजय हा विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा”

“आजचा शिवसेनेचा विजय हा विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र, तर काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष युतीने सर्व जागांवर लढले होते. या निवडणूकित शिवसेनेचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी- काँग्रेसला खातंही उघडता आले नाही.

सोयगाव मध्ये शिवसेना नेते व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी विजयीस्तव साजरा करत माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : यवतमाळमध्ये मनसेनं विजयी खातं उघडलं, मारेगाव नगरपंचायतीत मनसेचे 2 उमेद्वार विजयी

दरम्यान, सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले. हा विजय विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा असल्याचे प्रतिपादन सत्तार यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

औरंगाबादेत रावसाहेब दानवेंना धक्का! सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना धक्का; बीड नगरपंचायतीवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व

शिवसेनेचा नारायण राणेंना मोठा धक्का; राणेंच्या हातून गेली सत्ता