Home बीड बीडमध्ये धनंजय मुंडे यांना धक्का; बीड नगरपंचायतीवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना धक्का; बीड नगरपंचायतीवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचा निकाल हाती असून या निवडणुकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलं.

आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी वर्चस्व मिळवत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. तर वडवणी मध्ये सत्ताधारी भाजपाला बाजूला सारवत राष्ट्रवादीने विजय मिळवला. केजमध्ये राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्याठिकाणी राष्ट्रवादी, शेकाप आणि स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा नारायण राणेंना मोठा धक्का; राणेंच्या हातून गेली सत्ता

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येला पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्ह्यात मुंडे बहीण भावात रंगलेल्या सत्तासंघर्षात बहिण पंकजा मुंडे यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे.

दरम्यान, “सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. लोकांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे, असं सांगतानाच, बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती, अशी प्रतिक्रीया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती; शिवसेनेच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी

“सोलापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, मनसेच्या रेश्मा सुरेश टेळे नगरसेवकपदी विराजमान” 

“आबांच्या मुलानं नगरपंचायत गाजवली, कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांचा दणदणीत विजय”