Home महाराष्ट्र हत्तीच्या पिल्लाला चंपा, तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; किशोरी पेडणेकरांचं चित्रा...

हत्तीच्या पिल्लाला चंपा, तर माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवू; किशोरी पेडणेकरांचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचं बारसं करण्यात आलं आहे. त्यांना इंग्रजी नावे देण्यात आल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर टीका केली होती. यावरून आता शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप टीका करतंय ना, मराठी नावं ठेवायला हवी, मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेऊ, आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेऊ, असं प्रतिटोला पेडणेकरांनी यावेळी लगावला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हे ही वाचा : “भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

दरम्यान, केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा असा सल्लाही पेडणेकरांनी चित्रा वाघ यांना यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

गोपीचंद पडळकरांचा मोठा पराभव; खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा

“आजचा शिवसेनेचा विजय हा विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा”

यवतमाळमध्ये मनसेनं विजयी खातं उघडलं, मारेगाव नगरपंचायतीत मनसेचे 2 उमेद्वार विजयी