Home पुणे हे एक नंबर लबाड सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

हे एक नंबर लबाड सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

पुणे : हे एक नंबरचं लबाड सरकार आहे, अशी टीका करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“या सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत वेगवेगळी भूमिका मांडताना दिसतोय. यातून या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे एक नंबर लबाड सरकार आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा?,असा सवाल करत हे सरकार विद्यार्थ्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत कोणतेही प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे अशी टीकाही चंद्रकातं पाटलांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यात लाॅकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार- अजित पवार

“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”

“अखेर MPSC परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा”

“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद”