Home महाराष्ट्र ‘…तर मी विधानसभेचा राजीनामा देईन’; आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान

‘…तर मी विधानसभेचा राजीनामा देईन’; आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर टीका करत असताना ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

राज्य सरकारविरोधात जनमत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ, असं आवाहन मुनगंटीवार यांनी दिलं होतं. या आव्हानाला आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : 2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ठिक आहे! ते जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील तर आत्ता राजीनामा देतो. चला, माझी तयारी आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुळात मुनगंटीवार यांचंही कोण या सरकारमध्ये ऐकत नाही अशी परिस्थिती आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान,  पोपट मेलेला आहे. शिल्लक आमदारांना राजीनामा द्यायला सांगा. तुम्ही देखील वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. त्याठिकाणी टेस्ट घेऊ, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

RBI चा मोठा निर्णय; 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाद, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार

मोठी बातमी! भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

…म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात