Home नाशिक 2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या नोटाबंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नोटाबंदी झाली त्याचवेळी मी बोललो होतो. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारून नोटाबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : RBI चा मोठा निर्णय; 2 हजारांच्या नोटा वितरणातून बाद, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार

तेव्हा नोटा आल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नोट एटीएममध्ये जाईल की नाही याचा विचारही तेव्हा केला नव्हता. असले निर्णय परवडणारे नसतात. उद्या बँकेत पैसे टाकायचे. नंतर नवीन नोट आणणार. असं काही सरकार चालतं का? असा सवाल करत असे थोडे प्रयोग होतात. मी तेव्हाच या गोष्टी बोललो होतो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

…म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

“मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी?; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब”