Home महाराष्ट्र “मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी?; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब”

“मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी?; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यामुळे खरी शिवसेना, ही शिंदे गटाला मिळाली. तर उद्धव ठाकरेंना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नसून, गट मिळाला.

तसेच मशाल चिन्ह हे निशाण देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालं. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते चिन्ह आणि नाव कायम राहणार, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत संपल्याने आणि विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कार्यवाही सुरु केल्याने कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटाने पावले उचलली आहेत.

शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना, आमंत्रित करण्यात आलं आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होईल. तसेच शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभा होणार आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त…; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले; शिंदे गटाच्या या आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट

“मोठी बातमी! भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी”

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…