Home महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून निकालानंतर दुसऱ्याच दिवशी, शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली.

सिल्व्हर ओकमध्ये झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी काही फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर आता जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : 16 आमदार अपात्र ठरणार नाहीत, अजित पवारांच्या विधानावर, आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आम्ही सध्या कोणताही फॉर्म्युला तयार केलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकद आहे तिथे त्या पक्षाला प्रयोरिटी देऊ. तिन्ही पक्ष आणि इतर घटक पक्ष ज्यांनी महाविकास आघाडीला 2019 मध्ये पाठिंबा दर्शवला होता. त्यांना विश्वासात घेतले जाईल. सर्वांशी चर्चा केली जाईल आणि तिकीट वाटपाची तयारी करू, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे ठाम; जागा वाटपांवरून आघाडीत बिघाडी?”

“प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, गाैतमी पाटील हिनं घेतली, छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, चर्चांना उधाण”

“राष्ट्रवादीला मोठा धक्का, सुप्रिया सुळेंचा, अत्यंत निकटवर्तीय, ‘हा’ आमदार उद्या भाजपचं कमळ हाती घेणार”