Home जळगाव “मोठी बातमी! भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी”

“मोठी बातमी! भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादी पक्षासोबत बंडखोरी करत भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणाऱ्या, राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांना पक्षाने दणका दिला असून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतानाही त्यांनी जिल्हा दूध संघाची निवडणूक असो की, जिल्हा बँकेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसा सोबत बंडखोरी करत भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला होता.

ही बातमी पण वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाच्या पाठिंब्यावरच संजय पवार हे जिल्हा बँकेत अध्यक्ष झाले होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून कार्यभार सुद्धा पाहत होते. सातत्याने पक्षासोबत बंडखोरीच्या कारणामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. या सर्व तक्रारींची दखल घेत संजय पवार यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

16 आमदार अपात्र ठरणार नाहीत, अजित पवारांच्या विधानावर, आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे ठाम; जागा वाटपांवरून आघाडीत बिघाडी?”

“प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, गाैतमी पाटील हिनं घेतली, छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, चर्चांना उधाण”