Home महाराष्ट्र मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच- मुख्यमंत्री उद्धव...

मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात कमी पडलेले नाही. राज्य सरकार मराठा बांधवांच्या सोबतच आहे, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही, मग महाराष्ट्रातच का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावर सर्व पक्षाने एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठिंबा दिला. उच्च न्यायालयात याला आव्हान दिलं ते आपण जिंकलो. सर्वोच्च न्यायालयात आता लढत आहोत. पहिल्या सरकारने जे वकील दिलेत ते बदलले नाहीत. वकील कमी न करता आणखी वकील वाढवत आहोत. सर्वोच्च न्यायालयात कुठेही कमी पडलेलो नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार- उद्धव ठाकरे

“सरकार चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

“मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवच”