Home महाराष्ट्र “ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि…; राज ठाकरेंचा पाडव्याचा टीझर जाहीर, पहा व्हिडिओ”

“ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि…; राज ठाकरेंचा पाडव्याचा टीझर जाहीर, पहा व्हिडिओ”

277

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा 22 मार्चला शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याचा टीझर मनसेने जारी केला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनात राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता, त्यानंतर आता मनसेकडून हा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. मनसेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हे ही वाचा : “उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती महाराष्ट्रात पुन्हा चमत्कार घडवू; ‘या’ आमदाराचा दावा”

ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. व्हिडिओच्या सुरूवातीलाच हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील, असं लिहिण्यात आलं आहे. यानंतर राज ठाकरेंचं भाषण या व्हिडिओमध्ये लावण्यात आलं आहे. ‘माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन,’ असं राज ठाकरे या व्हिडिओत म्हणत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?; उज्वल निकमांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या राजकारणात आता गाैतमी पाटील करणार एन्ट्री?”

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराकडून, देवेंद्र फडणवीसांना थेट देवाची उपमा, म्हणाले…