Home महाराष्ट्र ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराकडून, देवेंद्र फडणवीसांना थेट देवाची उपमा, म्हणाले…

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराकडून, देवेंद्र फडणवीसांना थेट देवाची उपमा, म्हणाले…

269

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काल सकाळपासून आपल्या मतदारसंघाच्या पाणी प्रश्नावरुन आंदोलन पुकारलं होतं. त्यांच्या आंदोलनाची दखल अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेतली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर नितीन देशमुख यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी नितीन देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधत फडणवीसांना देवाची उपमा दिली.

हे ही वाचा : बंडखोरांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाले, मला ती माणसं…

“देवेंद्र फडणवीस यांना मी महादेव बोलतो. ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण त्यांनी तिथे येऊन पहावं की खाऱ्या पाण्यातलं आयुष्य कसं आहे? महिला आपल्या बाळांना खारं पाणी कशा पाजत आहेत, त्यांनी आमच्या व्यथा समजून घेतल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून माझं आंदोलन सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी यावेळी दिली.

दरम्यान, दोन दिवसांमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही देवेंद्र फडणवीस नागपूरला जिथे राहतात तिकडे याच पाण्याने त्यांचा अभिषेक करू. माझ्या प्रभागातल्या सगळ्या असंख्य शेकडो हजारो महिला तिथे जातील आणि आमच्या या महादेवाचे अभिषेक करतील, असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपचा काँगेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का; दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

“शिंदेंचा आता मनसेला दणका; राज ठाकरेंच्या ‘या’ निष्ठावान नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

…म्हणून मी त्यावेळी डोळा मारला; अखेर अजित पवारांनी केला खुलासा