Home नागपूर “शिंदेंचा आता मनसेला दणका; राज ठाकरेंच्या ‘या’ निष्ठावान नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

“शिंदेंचा आता मनसेला दणका; राज ठाकरेंच्या ‘या’ निष्ठावान नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

367

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता नागपूरमध्ये शिवसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मनसेचे जिल्हा सचिव मनोज गुप्ता यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हेकेखोर धोरणामुळे नाराज होऊन आपण मनसेला रामराम ठोकला, अशी प्रतिक्रिया मनोज गुप्ता यांनी या पक्षप्रवेशावेळी दिली.

हे ही वाचा : …म्हणून मी त्यावेळी डोळा मारला; अखेर अजित पवारांनी केला खुलासा

दरम्यान, गुप्ता यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह, खासदार कृपालजी तुमाने, जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख सुरज गोजे, युवासेनेचे निलेश तिघरे, कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे, शहरप्रमुख धीरज फंदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याच्या पुत्राने केला शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचच मिशन; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी”