Home महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?; उज्वल निकमांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?; उज्वल निकमांनी दिलं उत्तर, म्हणाले…

614

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही गटाचा युक्तिवाद आज संपला असून सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याप्रकरणावर आता कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सत्तासंघर्षांवर दोन्ही गटाकडून दोरदार युक्तिवाद करण्यात आला, यात दुमत नाही. यावेळी न्यायालयानेही दोन्ही गटाला काही प्रश्न विचारले, त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांचे निराकरण करणे हा या मागचा उद्देश होता. परंतु काल सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या कृतीबद्दल कठोर टीप्पणी केली होती. मात्र, ते त्यावेळी नोंदवलेलं त्यांचे मत होते. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होईल का? हे सध्या सांगता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी यावेळी दिली. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा : “महाराष्ट्राच्या राजकारणात आता गाैतमी पाटील करणार एन्ट्री?”

दरम्यान, माझ्यामते याप्रकरणात दोन महत्त्वाचे मुद्दे असतील. एक राज्यपालांनी घेतलेली भूमिका आणि दुसरा 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा. यापैकी 16 आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार कोणाला मिळेल, हे आता सांगता येणार नाही. घटनेनुसार हा अधिकारी विधानसभा अध्यक्षांना असतो. त्यामुळे हा अधिकार त्यांना मिळतो की न्यायालय त्यावर वेगळी भूमिका घेतात, हे बघावं लागेल. आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासाठी कदाचित तात्पुरत्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करण्याचे निर्देश सर्वाच्च न्यायालय राज्यपालांना देऊ शकतात. , असं उज्वल निकम म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराकडून, देवेंद्र फडणवीसांना थेट देवाची उपमा, म्हणाले…

बंडखोरांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाले, मला ती माणसं…

भाजपचा काँगेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का; दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश