Home क्रीडा हरलेली मॅच पाकिस्तानच्या खिशातून विराटने खेचून आणली; वेलडन विराट

हरलेली मॅच पाकिस्तानच्या खिशातून विराटने खेचून आणली; वेलडन विराट

371

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मेलबर्न : टी 20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली.

विराट कोहली या विजयाचा हिरो ठरला. त्याने हरलेली मॅच टीम इंडियाला जिंकून दिली. विराटने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकार होते. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली. रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले.

हे ही वाचा : भाजप-शिंदे गटासोबत युती होणार का?; मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणी हार्दिक पंड्या याने डाव संभाळला. यात हार्दिक पांड्याने 40 धावांचे योगदान दिले. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा फक्त 4 धावांवर तंबूत परतला.

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची जशी अपेक्षा असते, तसाच हा सामना झाला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना होता.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”

“गाैतम अदानीनंतर आता, अनंत अंबानी, ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल, चर्चांना उधाण”

“मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”