Home बीड “मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”

“मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”

427

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे अडचणीत आले आहेत.

जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे.

हे ही वाचा : दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार?; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

बीड शहरातील विकास कामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ऑनलाईन शुभारंभ करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाल क्षीरसागर यांनीही उपस्थिती लावली होती. त्यामुळे आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली. जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही. नुकत्याच केलेल्या उद्घाटनात कुठेही त्यांचा उल्लेख केला नाही. ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, असं धोंडीराम पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसेसोबत युती करण्याबाबत शहाजीबापू पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले..