Home नांदेड मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, एकनाथभाऊ, डायलाॅग खूप मारतात,...

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, एकनाथभाऊ, डायलाॅग खूप मारतात, पण…

235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जाहीर सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मी गद्दार नसून खुद्दार आहे, असं शिंदे म्हणाले. तसेच हे सरकार घेणारे नाही. हा मुख्यमंत्री देणारा आहे. देत देत आला आहे, असंही शिंदे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या डॅशिंग नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटातील ‘या’ मोठया नेत्याचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री शिंदेंचा अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे, असे त्यांनी म्हणणं हा ‘जोक ऑफ द डिकेड’ आहे., असा टोला सुषमा अंधारे यांनी यावेळी लगावला. त्या नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

दरम्यान, तु्म्ही लोकांना देणारे असाल तर महिलांसाठी अर्ध तिकीट नाही, 1200 वरचा सिलेंडर 400 वर आणा. जर तुम्ही देणारे असाल, तर कापसाच्या भावाचे काय झाले ते सांगा. हरभरा, गहू पिकाचे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यावर तुम्ही का बोलत नाहीत? जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? मला वाटते, एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात. पण त्यांचा स्क्रिप्टरायटर, त्यांनी बदलायची गरज आहे, अशी टोलेबाजीही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते, मी साक्षीदार आहे, म्हणत, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

“ठाकरेंचा शिंदेना पुन्हा दणका, शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची गृहवापसी”

“मुख्यमंत्री शिंदेंच्या कामामुळे समाधानी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याकडून स्तुतीसुमने, चर्चांना उधाण”