Home नाशिक “मुख्यमंत्री शिंदेंच्या कामामुळे समाधानी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याकडून स्तुतीसुमने, चर्चांना उधाण”

“मुख्यमंत्री शिंदेंच्या कामामुळे समाधानी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याकडून स्तुतीसुमने, चर्चांना उधाण”

237

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर महाविकास आघाडीतील नेते भाजप आणि शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहेत.

अशातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काैतुक केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : “ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि…; राज ठाकरेंचा पाडव्याचा टीझर जाहीर, पहा व्हिडिओ”

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आमची संधी घालवली. मात्र ते चांगले काम करत आहेत,  असं म्हणत थोरातांनी जाहीर सभेत शिंदेचं काैतुक केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात, मोठी संधी आहे. तुम्ही चांगलं काम करत आहात. मात्र तुम्ही आमची संधी घालवली ही खरी बाब आहे. पण तुम्ही मेहनती आहात. हे आम्ही विसरू शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ज्या काही घोषणा केल्यात त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहात ते आम्ही मनापासून मानतो, असं म्हणत थोरातांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती महाराष्ट्रात पुन्हा चमत्कार घडवू; ‘या’ आमदाराचा दावा”

सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?; उज्वल निकमांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या राजकारणात आता गाैतमी पाटील करणार एन्ट्री?”