Home नाशिक “ठाकरेंचा शिंदेना पुन्हा दणका, शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची गृहवापसी”

“ठाकरेंचा शिंदेना पुन्हा दणका, शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची गृहवापसी”

442

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत, भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाकास आघाडीचं सरकार कोसळलं.  त्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा कल वाढला.

त्यानंतर ठाकरे गटाच्या असंख्य शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र काही दिवसांनंतर, गेले काही दिवस आमचा कोंडमारा होत होता, आमची दिशाभूल करून, शिंदे गटात नेलं होते, खोटी आश्वासने देऊन गद्दारांच्या कळपात नेलं होतं, असं म्हणत असंख्य शिवसैनिकांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत गृहवापसी केली.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री शिंदेंच्या कामामुळे समाधानी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याकडून स्तुतीसुमने, चर्चांना उधाण”

दरम्यान, गृहवापसी केलेल्या शिवसैनिकांमध्ये विनोद नुनसे, स्वप्नील गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे, दादू खंडारे, सार्थक तालखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश वाबळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव, राहुल येवले, या शिवसैनिकांसह शिंदे गटाच्या नेत्यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज राजपूत, दिनेश शिंदे, भावेश पगार यांनीही शिंदेंची साथ सोडत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि…; राज ठाकरेंचा पाडव्याचा टीझर जाहीर, पहा व्हिडिओ”

“उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती महाराष्ट्रात पुन्हा चमत्कार घडवू; ‘या’ आमदाराचा दावा”

सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?; उज्वल निकमांनी दिलं उत्तर, म्हणाले…