Home महत्वाच्या बातम्या सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी उतरल्या मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे केली ’ही’ महत्वाची मागणी

सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी उतरल्या मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे केली ’ही’ महत्वाची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी मैदानात उतरल्या आहेत. महिलांना कुटुंबातील संपत्ती व मालमत्तेत समान अधिकार मिळावा आणि यासाठी राज्यशासनानेच उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केलं आहे.

महाराष्ट्र राज्याने देशात पहिल्यांदा महिला धोरण जाहीर करून अंमलात आणले महिलांना संपत्तीत वाटा मिळावा यासाठी अनेक कायदे केले आहे. या कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना सारख्या योजनाही राबवल्या आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस- अमित शाहांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक; गोवा जिंकण्यासाठी आखणार रणनिती

महाराष्ट्र राज्य या बाबतीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जरी पुढे असले तरीसुद्धा प्रत्यक्ष शासनाला अपेक्षित असलेली उदिष्टे अजूनही साध्य झाली नाहीत. आजही आपल्या देशात काबाडकष्टातला बाईचा वाटा 65 % तर संपत्तीत वाटा 13.9% अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नाही, याची खंत आपणा सर्वांनाच आहे. आपल्या राज्यात सोपेकॉम सारखी संस्था व देशपातळीवर मकाम सारखे नेटवर्क या विषयाच्या अनुषंगाने अनेक वर्षे यातील कायदेशीर बाजू तसेच सामाजिक आशयाच्या बाजूने अत्यंत अभ्यासपूर्वक काम करीत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण”

समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर…, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा

जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; संघाचा भाजपाला सल्ला